Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ST Bus Ticket Price Hike : एसटीचा प्रवास महागणार! शिवनेरी ७० तर साधी एसटीत ६० ते ८० रुपयांची होणार भाडेवाढ

ST Bus Ticket Price Hike : एसटीचा प्रवास महागणार! शिवनेरी ७० तर साधी एसटीत ६० ते ८० रुपयांची होणार भाडेवाढ

मुंबई : काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने शासनाकडे तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र आता त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून नववर्षापासून एसटी बस तिकीटांची दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मोठी पसंती असणाऱ्या लालपरीचा प्रवास (ST Bus Ticket Price Hike) महाग होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षापासून शिवनेरी बसमध्ये ७० रुपये तर साध्या एसटी बसचे तिकीट दरात ६० ते ८० रुपयांची भाडेवाढ होणार आहे.



याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीट दरवाढ झाली होती. त्यानंतर आता तीन वर्षाच्या कालावधीनंतर एसटी बसच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. (ST Bus Ticket Price Hike)

Comments
Add Comment