Thursday, January 15, 2026

Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!

Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!

आमदार नितेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

नागपूर : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु या मागणीवर 'मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी कुणाला रेकी करायची गरज नाही', अशी बोचरी टीका आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

'खिचडीचोर नेमका कुठे राहतो, खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत. कारण संजय राऊत याना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्याचे राजकीय महत्त्व जनतेने संपविले आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी आम्ही गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विनहीं आला आहे फार गांभीर्याने घेऊ नका, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा