Thursday, May 22, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Mahad MIDC : महाड स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली; जखमींचा आकडा ९ वर

Mahad MIDC : महाड स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली; जखमींचा आकडा ९ वर

महाड : महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रांमधील एसटेक लाईफ सायन्स कंपनीत काल (दि.१९) रोजी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली असून जखमींचा आकडा ९ वर पोहोचल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान MIDC पोलीस ठाण्याने कंपनी प्रशासनाच्या ९ प्रमुख अधिका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



कसा झाला हा स्फोट ?


महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र परिसरातील काळीज गावच्या हद्दीतील एसटेक लाईफ सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये काल तीनच्या सुमारास अचानक एका रसायन असलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याचा आवाज परिसरातील तीन किलोमीटर पर्यंत पसरला. या स्फोटाच्या तीव्रतेने उडालेले प्लांटचे पत्रे व लोखंडी तुकडे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना लागून ते जखमी झाले.

Comments
Add Comment