Friday, March 28, 2025
HomeदेशJaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipure शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जयपूरच्या भांकरोटा येथे अनेक गाड्यांना एकदम आग लागली. खरंतर, येथे एक सीएनजी ट्रकची धडक इतर गाड्यांना बसली. यामुळे भीषण आग लागली. या आगीचा फटका आजूबाजूच्या गाड्यांनाही बसला. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी बसमधून उतरत आपला जीव वाचवला. दरम्यान १२हून अधिक जण होरपळल्याची माहिती मिळत आहे.

 

ही दुर्घटना डी क्लॉथोनजवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -