Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीLaxmi Niwas : झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; अर्धा नव्हे एक...

Laxmi Niwas : झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; अर्धा नव्हे एक तास होणार प्रेक्षकांचं मनोरंजन!

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. म्हणूनच आता झी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सर्व वाहिनींवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका या अर्धा तास असतात. परंतु ही मालिका प्रेक्षकांचं तब्बल एक तास मनोरंजन करणार आहे.

अनेक आव्हानांचा सामना करत कुटुंबाची मोट बांधुन ठेवणाऱ्या जोडप्याची गोष्ट, प्रत्येक मध्यमवर्गीयाला आपलीशी वाटणारी ‘लक्ष्मी निवास’ अशी ही खरी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या २३ डिसेंबरपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका झी मराठीवर झळकणार आहे.

Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

काय आहे मालिकेची कथा?

‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. ३ मुलं, ३ मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते आहेत क्रिएटिव्ह माईंड सुनील भोसले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -