Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Shirdi : साईमुर्तीची तज्ज्ञांमार्फत पाहणी

Shirdi : साईमुर्तीची तज्ज्ञांमार्फत पाहणी

शिर्डी : जगाला श्रध्दा- सबुरी बरोबरच सबका मलिक एक संदेश देणारे व करोडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या मुर्तीचे संवर्धन करण्यासाठी तसेच मुर्तीची झीज रोखण्यासाठी भाविकांसाठी दर्शन व्यवस्था तीन तास बंद ठेवून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या तज्ञांमार्फत शुक्रवारी साईमुर्तीची पहाणी केली.


श्री साईबाबांच्या मुर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ञांनी मुर्तीच्या स्नानासाठी कमी पाण्याचा वापर करणे, मुर्तीला आंघोळ घातल्यानंतर टॉवेलने घासणे, दही-दुधाचा, गंधाचा वापर टाळणे, गंधासाठी चंदनाचाच वापर करणे आदी तोंडी सुचना केल्या. काही अंशी मुर्तीची झीज झाल्याचेही तज्ञांनी मान्य केले. याबाबतचा लेखी अहवाल संस्थानला प्राप्त झाल्यानंतर साईसंस्थानची समिती निर्णय घेइल असे साईसंस्थानचे प्रभारी सीईओ कोळेकर यांनी सांगितले.


/>

वस्तु संग्रहालयाचे एस मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ञांचे पथक सकाळीच शिर्डीत दाखल झाले. या पथकाने द्वारकामाई मंदिराची पहाणी केली. त्यानंतर दुपारी पावणे दोन नंतर साईमंदिर पुर्णपणे बंद करण्यात आले. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद करण्यात आली. याशिवाय मुर्तीच्या बाजुने पडदे लावून मुर्तीचे मायक्रो इन्सपेक्शन करण्यात आले. विशेष म्हणजे मुर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी तज्ञांनी सोहळे परिधान केले होते.


मुर्तीला जेथे काळे डॉट आले आहेत, किंवा जेथे झीज झालेल्या ठिकाणची अद्ययावत कॅमेऱ्याने फोटोग्राफी करून ते अभ्यासासाठी संगणकात संरक्षीत करण्यात आले. मुर्तीला काही इजा झालेली आहे की काय याची पहाणी करण्यात आली.

Comments
Add Comment