राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात सुसूत्रता आणून पारदर्शकता आणणार - अजित पवार

मुंबई : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ कर प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निकडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जीएसटी’ कॉन्सिलच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत ‘जीएसटी’च्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशातल्या एकूण कर संकलनापैकी १६ टक्के करसंकलन एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. देशांतर्गत एकूण कर संकलनातमहाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यामुळे राज्यातल्या ‘जीएसटी’ करप्रणालीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्याच्या सीमेलगतच्या भागातून होणारी करचुकवेगिरीची प्रकार थांबविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, सबसिडीच्या योजना राबविण्यात येतात. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या ‘जीएसटी’ कॉन्सिलच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

*महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२ (सुधारणा) विधेयक, २०२४ मंजूर*

‘महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२ (सुधारणा) विधेयक, २०२४’ आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्य शासनाचा महसूल वाढवण्यार भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार सध्याच्या महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ मधील कलम ३७ नुसार वसुलीबाबत राज्याचा प्रथम भार विशिष्ट शर्तीच्या अधीन राहून होता. या विधेयकांच्या सुधारणेनुसार महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ अंतर्गत विनाशर्त प्रथम भार स्थापित झाल्यानंतर जलद गतीने वसुली करणे शक्य होणार आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल खरेदी करुन व्यापारी खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटींना बॅरेलद्वारे पुरवठा करतात. हा पुरवठा अन्य पेट्रोलपंपाद्वारे केल्या जाणाऱ्या पुरवठ्याप्रमाणे गृहीत धरुन कर भरणा करण्यापासून व्यापारी सूट घेतात. या सुधारणेमुळे किरकोळ विक्री केंद्राची व्याख्या आणि किरकोळ विक्रीचे स्पष्टीकरण कायद्यात समाविष्ट होऊन कर चुकवेगिरीला रोखणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कायद्यातल्या कलम २ (२४) (पाच) या कलमामध्ये सुयोग्य स्पष्टीकरणाचा समावेश केल्यामुळे, एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर कर आकारणी शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता