
काही प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी
पुणे : पुण्याजवळील ताम्हिणी घाट मोठ्या वळणांचा असल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात घडत असतात. काही दिवसांपूर्वीच या घाटात शालेय बसचा अपघात झाला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका बसचा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.

ठाणे : सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते/ नागरिक ...
मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते महाड येथे लग्नाचे वऱ्हाड येथे जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माणगाव- पुणे मार्गावर माणसांनी खचाखच भरलेली बस ताम्हिणी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये चार ते पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.