ठाणे : सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते/ नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे या करिता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
https://prahaar.in/2024/12/20/the-seriousness-of-the-mahad-blast-case-has-increased-the-number-of-injured-has-reached-9/
ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य करवसुली कार्यालय व नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र दि. 01.12.2024 ते 31.12.2024 या कालावधीतील सर्व शनिवार सकाळी 10.30 ते सायं. 4.30 वाजेपर्यत तसेच दि. 01.01.2025 ते 31.03.2025 या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (दि. 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून ) सकाळी 10.30 ते सायं. 4.30 आणि तसेच सर्व रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत.
महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरुन Payment Gateway द्वारे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप द्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करु शकतील. तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.