
तीन वर्षाच्या बाळासह अख्ख कुटुंब समुद्रात बुडालं
मुंबई : मुंबई ही सगळ्यांना भुरळ घालणारी नगरी आहे. काहीजण कामानिमित्त तर काहीजण फिरण्यासाठी अनेकदा कित्येक किलोमीटर लांबून मुंबईत येतात. मुंबईतल्या समुद्र सफारीच अख्ख्या जगाला वेड आहे. मात्र काल (दि.१८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेल्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या मृत्यू पावलेल्या प्रवाशांपैकी पिपंळगावातील आहेर कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

मुंबई : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ नीलकमल बोटीच्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.तर ...
नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव बसवंत येथील नाना आहेर हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत दम्याच्या उपचारासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्नी व मुलासह गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्र सफारीचा आनंद घेण्याचे ठरवले होते. मात्र हि सफर त्यांच्या आयुष्यातली शेवटची सफर ठरली. या घटनेने पिंपळ गावात शोककळा पसरली आहे.