मुंबई : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ नीलकमल बोटीच्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.तर केंद्रातून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा खर्च सरकारच करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
काल ( दि. १८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली नीलकमल बोट समुद्रात उलटली. ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने जात होती. दरम्यान नौदलाच्या स्पीड बोटचा ताबा सुटल्याने स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली आणि प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले.माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीतील १०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नौदलाच्या बोटीच्या चालकाला कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.