Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आश्वासन देत नवनिर्वाचित सभापतींच केलं स्वागत

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास  दानवेंनी आश्वासन देत नवनिर्वाचित सभापतींच केलं स्वागत

नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवोनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले. आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहात. आज तुम्ही या सर्वोच्च पदी बसल्याचा सर्वात जास्त आनंद तुमच्या माऊलीला होत असेल असे म्हणत दानवे यांनी शिंदे यांच्या सभागृहात बसलेल्या आईच स्वागत केलं.



विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच जलयुक्त शिवार योजनेत मंत्री झाल्यावर केलेल्या कामाचं कौतुक केलं. आपल्या कामात आमचं पूर्ण सहकार्य राहील. सभागृहात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांवर जास्त लक्ष ठेवा अशी विनंती दानवे यांनी सभापती यांना केली. आपल्या राजकीय जीवनात जरी संघर्ष राहिला असला तरी विरोधी पक्ष राज्याच्या हितासाठी संघर्षाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.

Comments
Add Comment