मुंबई: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट उलटल्याने बुधवारी मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. यामुळे ही दुर्घटना घडली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात नौदलाच्या ३ जवानांसह १३ जणांचा मृत्यू झाला.
एलिफंटाच्या दिशेने जात होती बोट
ही घटना बुधवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. एलिफंटाच्या दिशेने ही नीलकमल बोट जात होती. यावेळी उरण, करंजाजवळ नौदलाच्या स्पीड बोटची धडक बसल्याने ही बोट पलटली. या बोटीमध्ये साधारण ११०हून अधिक जण होते. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाधिक लोकांना वाचवण्यात आले आहे तर १३ जणांचा यात मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररित्या जखमी झालेत.
#WATCH | Mumbai Boat Accident | Maharashtra CM Devendra Fadnavis says, “Near Mumbai, at the Butcher Island, a Navy boat collided with ‘Neelkamal’ passenger vessel at around 3.55 pm. As per the information till 7.30 pm, 101 have been rescued safely and 13 people have died. Among… pic.twitter.com/9hnAeeGpJD
— ANI (@ANI) December 18, 2024
यासंदर्भातील माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ ‘नीलकमल’ ही फेरीबोट उलटली. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बोटीमधील १०१ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झालाय. गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाकडे जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरुन नीलकमल नावाची बोट निघाली होती. यावेळी समुद्रातून दुसऱ्या बाजूने एक स्पीडबोट जात होती. यावेळी त्या स्पीडबोटचे नियंत्रण सुटल्याने ती बोट सरळ फेरीच्या बोटीवर येऊन जोरात आदळली. त्यामुळे फेरीची बोट बुडाली. या घटनेचा व्हिडीओ सद्धा व्हायरल होत आहे.
या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुक्रम विधानसभा आणि विधान परिषदेत माहिती दिली
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियासाठी प्रत्येकी पाच लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे.