मायरा वायकुळ लवकरच दिसणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमात

मुंबई: टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.


ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.


अल्पावधीतच जगभरात पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत,सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे? सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोस्टकार्डच्या प्रमोशनचा चित्रपटाशी नक्की कसला संबंध आहे? हे जाणुन घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या