Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीMHADA : म्हाडाची पावणेसात कोटींची घरे विक्रीविना

MHADA : म्हाडाची पावणेसात कोटींची घरे विक्रीविना

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाला मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी प्राप्त झालेली ताडदेवमधील घरे काही केल्या विकली जात नसल्याचे चित्र आहे. येथील पावणे सात कोटींच्या सात घरांपैकी चार घरे विक्रीवाचून पडून आहेत. चारपैकी एका घराचा २०२४ च्या सोडतीत मंडळाने समावेशच केलेला नाही तर उर्वरित तीन घरे विजेत्यांनी परत (सरेंडर) केली. उर्वरित एका घरासाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. दोन घरांसाठी विजेत्यांनी अद्यापही स्वीकृती न दिल्याने ती घरे विकली जाणार का, याची चिंता मुंबई मंडळाला लागली आहे.

दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला २०२३च्या सोडतीसाठी ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील १४१.३० चौ.मी. आणि १४२.३० चौ. मी.ची अशी एकूण सात घरे उपलब्ध झाली होती. २०२३ मध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात आली. या घरांच्या किंमती साडेसात कोटींच्या घरात होत्या. म्हाडाच्या (MHADA) किंमतीनुसार ही घरे महाग असली तरी बाजारभावाच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने ती विकली जातील असा विश्वास मुंबई मंडळाला होता. मात्र २०२३च्या सोडतीत सातपैकी एकही घर विकले गेलेले नाही. ही घरे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे शेवटी या घरांचा समावेश मंडळाने २०२४ च्या सोडतीत केला.

संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की; भाजपाचे २ खासदार रुग्णालयात दाखल

दरम्यान म्हाडाने (MHADA) २०२४च्या घरांच्या सोडतीत किंमती १० ते २५ टक्क्यांनी कमी केल्याने या घरांच्या किंमती ७५लाखांनी कमी होऊन त्या पावणे सात कोटींच्या घरात गेल्या. मंडळाच्या २०२४च्या सोडतीतील ताडदेवमधील या सहा घरांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण जेव्हा प्रत्यक्षात विजेत्यांकडून स्वीकृती पत्र घेण्याची वेळ आली तेव्हा चार विजेत्यांनी घरे परत केली, तर दोन विजेत्यांनी स्वीकृती पत्रच दिले नाही. ही घरे मोक्याच्या ठिकाणी आणि प्रशस्त इमारतीत आहेत. घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी आहेत. असे असतानाही या घरांना का प्रतिसाद मिळत नाही हा सर्वांचा प्रश्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिसाद न मिळालेल्या घरांचा समावेश आगामी २०२५ च्या सोडतीत केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -