मुंबई : सुपरस्टार गोविंदाला ओळखत नाही असा एकही सिनेरसिक आढळणार नाही. कॉमेडी सिनेमांमधून गोविंदाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही गोविंदा बॉलिवूडमध्ये चर्चेत असतो. पण आता गोविंदाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. २०२५ मध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा सिल्वर स्क्रीनवर दिसणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून यशवर्धन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Sharvari Wagh : गोदरेज प्रोफेशनलची शर्वरी बनली पहिली ब्रँड ॲम्बेसेडर
मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेश यांच्या आगामी रोमँटिक सिनेमात गोविंदाचा लेक यशवर्धन काम करणार आहे. यशववर्धनबरोबर कोणती अभिनेत्री काम करणार हे अजून निश्चित झालं नाहीये. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार अजून सिनेमाचे दिग्दर्शक नवोदित अभिनेत्रींचा शोध घेत आहेत. एक फ्रेश जोडी या सिनेमाच्या माध्यमातून मेकर्सना प्रेक्षकांसमोर आणायची आहे असं सूत्रांनी सांगितलं. २०२५ मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. सध्या सिनेमासाठी ऑडिशन सुरु असून यशवर्धनसोबत कोणती हिरोईन झळकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
View this post on Instagram
पदार्पण करण्यापूर्वी यशवर्धनने निर्मितीक्षेत्रात बराच काळ काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे डान्स स्किल्स बघून अनेकजण प्रभावित झाले होते.