Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीTadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

चंद्रपूर: ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणखी दोन अवयस्क नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांचे विखुरणे, ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘रॅपिड रेस्क्यू टीम’ आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) च्या संयुक्त विद्यमाने मुल (बफर) अंतर्गत केसलाघाट जंगलात केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी वाघिणीचे दोन नर शावक टी-२९ (के -निशाण) रेडिओ कॉलर केले गेले. आता जे जंगलात विखुरण्यासाठी तयार आहेत, अश्या दोन्ही ‘कॉलर’ केलेले वाघ अवयस्क नर आहेत.. याआधी टी-२९ वाघिणीचे शावक आणि टी-१६२ चे दुसरे शावक यांना बुधवारी अशाच संयुक्त ऑपरेशनमध्ये ‘रेडिओ कॉलर’ केले गेले होते.

https://prahaar.in/2024/12/18/so-tomorrow-someone-will-have-to-take-the-law-into-their-own-hands/

ताडोबा अंतर्गत जवळजवळ सर्व भाग मोठ्या संख्येन वाघांनी आधीच व्यापलेला असल्याने, कॉलर केलेले शावक प्रकल्पातून बाहेर पडण्याची आणि आजूबाजूच्या जंगलात जाण्याची शक्यता जास्त आहे. या वाघांच्या हालचालींचा मागोवा घेतल्याने केवळ त्यांच्या विखुरण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात मदत होणार नाही, तर वन्यजीव, कॉरिडॉरचे मॅपिंग करण्यात आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यात मदत होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सदर उपक्रम ‘लॉन्ग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’, ‘को-प्रिडेटर्स’ आणि’ प्रे स्पीसीज इन टीएटीआर ॲण्ड ॲण्डजाईनिंग लँडस्केप्स’ या चालू संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. हा राज्य सरकारच्या मान्यतेने २०१४ पासून सुरु आहे. प्रकल्पातील पुढील प्रगती अतिरिक्त ‘रेडिओ कॉलर’ खरेदी करण्यावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून प्राप्त केले जातात. ताडोबा निरीक्षण आणि संशोधन प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी लवकरच आणखी १० कॉलरसाठी ‘ऑर्डर’ देण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -