
चंद्रपूर: ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणखी दोन अवयस्क नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांचे विखुरणे, ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘रॅपिड रेस्क्यू टीम’ आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) च्या संयुक्त विद्यमाने मुल (बफर) अंतर्गत केसलाघाट जंगलात केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी वाघिणीचे दोन नर शावक टी-२९ (के -निशाण) रेडिओ कॉलर केले गेले. आता जे जंगलात विखुरण्यासाठी तयार आहेत, अश्या दोन्ही ‘कॉलर’ केलेले वाघ अवयस्क नर आहेत.. याआधी टी-२९ वाघिणीचे शावक आणि टी-१६२ चे दुसरे शावक यांना बुधवारी अशाच संयुक्त ऑपरेशनमध्ये ‘रेडिओ कॉलर’ केले गेले होते.

गोहत्येवरून आमदार निलेश राणे आक्रमक नागपूर : महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही आणि या लोकांवर कारवाई केली नाही ...