बोटीत अनेक प्रवासी अडकल्याची शक्यता
मुंबई : गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाली असून नीलकमल नावाची बोट उलटली असून यामध्ये ३० प्रवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बोट बुडत असल्याची माहिती मिळताच आजुबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचावकार्य सुरु केले. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
नेव्हीच्या स्पीडबोटने धडक दिल्यामुळे घडली दुर्घटना; ३ ठार, ६६ जणांना वाचवले, ७-८ जण बेपत्ता