Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीKedarnath Viral Video : केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद असूनही नास्तिकाने केला चप्पल...

Kedarnath Viral Video : केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद असूनही नास्तिकाने केला चप्पल घालून प्रवेश; मूर्तींसोबतही केली छेडछाड!

खळबळजनक व्हिडिओ आला समोर

डेहराडून : उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचा एक धक्कादायक व्हिडिओ (Kedarnath Viral Video) व्हायरल होत आहे. दरवाजे बंद असतानाही एक व्यक्ती केवळ केदारनाथलाच पोहोचली नाही, तर चपला घालून भैरवनाथ मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून येते. त्यानंतर मूर्ती आणि दानपेटीतही लाकडाच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आली. ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोपी व्यक्ती केदारनाथमध्ये पुनर्बांधणीचे काम करणाऱ्या गवर कंपनीत मजूर असल्याचे समोर आले आहे.

Water Transport : समुद्रातील गाळाचा जलवाहतुकीला फटका!

ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी कामगार, कंत्राटदार आणि कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला. रुद्रप्रयाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

भाविकांकडून नाराजीचा सूर

या घटनेबाबत स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये नाराजी आहे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणतात. या घटनेमुळे धार्मिक श्रद्धा दुखावणार असून ती रोखण्यासाठी प्रशासनाला आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी मजुरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -