Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Sindhu Tai Sakpal Daughter : सिंधू ताईंच्या कन्येला पहिला हिरकणी पुरस्कार जाहीर

Sindhu Tai Sakpal Daughter : सिंधू ताईंच्या कन्येला पहिला हिरकणी पुरस्कार जाहीर

तुळजापूर : ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सकपाळांच्या कन्या ममता सकपाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी अध्यात्मिक गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


समाजसेविका ममता सकपाळ यांना हा पुरस्कार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे सहअध्यक्ष गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी महाराज यांच्या हस्ते जिजाऊ जयंतीनिमित्त १२ जानेवारीला श्रीनाथ लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे.


/>

ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य त्यांच्या कन्या ममता सिंधुताई सकपाळ करत आहेत. शेकडो अनाथांची ताई म्हणून हिंमतीने सांभाळ करत आहेत. त्या कार्याला बळ मिळावे यासाठी पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात येत आहे.

Comments
Add Comment