Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाR Ashwin Retires : आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

R Ashwin Retires : आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा महान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.

अश्विनने घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी सामना अनिर्णित राहण्याची घोषणा होताच अश्विनने निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं. अश्विन निवृत्ती घेणार याची चाहुल चाहत्यांना आधीच लागली होता. सामना संपण्याआधी अश्विनने विराट कोहलीली मिठी मारली होती, त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यावरूव सर्वांना अंदाज आला होता की अश्विन आता निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

पत्रकार परिषदेमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा करताना तो भावनिक झालेला दिसला. या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. आर अश्विन आता एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही तो संघासोबत राहील, अशी अपेक्षा आहे. अश्विनने जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर केली. मात्र तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेडमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना हा अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला.आर अश्विन याने ६ नोव्हेंबर २०११ रोजी विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. अश्विनने या दरम्यान एकूण १०६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. अश्विनने या दरम्यान २०० डावांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ३७ वेळा ५ आणि ८ वेळा १० विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने १५१ डावांमध्ये बॅटिंग करताना ६ शतकं आणि १४ अर्धशतकांसह ३ हजार ५०३ धावा केल्या. अश्विनची १२४ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अश्विनने या दरम्यान २३ षटकार आणि ३९९ चौकार ठोकले. दरम्यान अश्विन ११६ एकदिवसीय आणि ६५ टी २० सामने खेळला आहे. अश्विनने वनडेमध्ये ७०७ धावा करण्यासह १५६ विकेट्स घेतल्या. तर ऑलराउंडरने टी २०i मध्ये ७२ फलंदाजांना बाद केलं. तसेच १८४ धावा केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -