Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai Boat Accident : गेटवेच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मदतीचे आश्वासन

Mumbai Boat Accident : गेटवेच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मदतीचे आश्वासन

मुंबई : मुंबईत आज गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले. माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीत ८० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


मी नुकताच मुंबईतील घटनेचा व्हिडिओ पाहिला. कोस्ट गार्ड किंवा भारतीय नौदलाची ती बोट आहे. त्या बोटीचे नियंत्रण सुटल्याने तिथे प्रवासी बोट होती ही एलीफंटाकडे जात होती. त्या बोटीला धडक दिली आहे. त्या ठिकाणी मदत वेगाने पोहोचल्याने अनेक जणांना वाचवण्यात यश आले आहे. जे कोणी जखमी झाले असतील किंवा काही लोकांचा मृत्यू झाला असेल तर सरकार म्हणून आवश्यक मदत आम्ही करू.





हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. सुमारे ५० मीटर त्यांची बोट किनारा सोडून आत गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. या अपघताची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन केलं आहे.

Comments
Add Comment