Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीDrone Farming : भारतीय शेतक-यांना आता शेतीफवारणीत ड्रोनची मदत घेता येणार

Drone Farming : भारतीय शेतक-यांना आता शेतीफवारणीत ड्रोनची मदत घेता येणार

मुंबई : देशात कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादनांच्या निर्मितीसाठी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि क्रिश-ए या दोन कंपन्यांनी भागीदारी केल्याचे आज जाहीर केले. महिंद्रा एण्ड महिंद्रा लिमिटेड फार्म इक्विप्मेंट सेक्टर कंपनीच्या व्यवसाय वृद्धीकरणाचा भाग म्हणून क्रिश ए कंपनीची निर्मिती झाली आहे. कोरोमंडल कंपनीच्या ग्रोमोर ड्राइव्हच्या माध्यमातून शेतीतील बी-बियाणे तसेच इतर कामांसाठी ड्रोन फवारणी सेवा देली जाईल. जेणेकरुन शेतक-यांच्या दैनंदिन कामकाजात हातभार लागेल.

सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आरपीटीओच्या प्रशिक्षित वैमानिकांकडून ग्रोमोर ड्राइव्हची सेवा दिली जात आहे. कोरोमंडल ड्रोन सेवा धक्षा मानवरहित प्रणालीच्या आधारे कार्यान्वित केली जाते. या प्रणालीच्या वापराने कंपनीला बाजारपेठेत अग्रगण्य स्थान मिळाले आहे. कंपनी ड्रोन पुरवठ्यसह पायलट प्रशिक्षण तसेच आवश्यक सर्व सेवा ग्राहकांना पुरवते. बाजारात ड्रोनसेवेच्या वाढत्या मागणीत कॉरॉमन्डेल कंपनी एक उदयोन्मुख कंपनी म्हणून उदयास आली आहे. ड्रोनसेवा पुरवताना महिंद्रा कंपनीच्या एफईएस विभागाच्यावतीने शेतक-यांना क्रिश एखेती के लिए एप हे एप्लिकेशन पुरवले जाते. या एप्लिकेशनच्या मदतीने शेतक-यांना पिकांशी तसेच शेतीव्यवसायाशी संबंधित विकासात तंत्रज्ञानाची मदत दिली जाते. क्रिश एखेती के लिए एप या एप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीव्यवसातील उत्त्पन्नात वाढ करु शकतात. त्यांनाशेती व्यवसायाशी निगडीत इतर साखळ्यांमध्येही सहभाग घेता येतो. शेतक-यांच्या आर्थिक वाढीस मदत होते.

CM Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

दोन्ही कंपन्यांन्यांच्या प्रमुखांनी भागीदारी जाहीर करत सामंजस्य करारावर (नॉन बाइंडिंग म्हणजेच बंधनकारक नसलेल्या) स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे खत व्यवसाय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमील अल्वी म्हणाले की, ‘‘ कोरोमंडल कंपनी ग्रोमोर ड्राइव्हच्या माध्यमातून शेतक-यांना शेतीतील लागवडीशी निगडीत दर्जात्मक अत्याधुनिक सेवा, कार्यक्षमता तसेच मापनक्षमता उपलब्ध करुन देते. कोरोमंडल कंपनीच्या गोमोर ड्राइव्ह आणि महिंद्रा कंपनीच्या क्रिश-ई कंपनीसोबत झालेल्या (नॉनबाइण्डिंग) करारातून आता शेतक-यांना शेतीतील कामांत ड्रोन फवारणी सुविधा उपलब्ध होईल. करारावर स्वाक्षरी करुन या कामाची सुरुवात होत असल्याने हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. कमीतकमी गुंतवणूकीतून शेतमालाची उत्पादनक्षमता वाढवणे, शेतक-यांना जास्तीजास्त नफा मिळवून देणे याकडे आमचा भर राहील. कंपनीचीच निर्मिती असलेल्या दक्षा मानवरहित प्रणालीतून ग्रोमोर ड्राइव्ह तयार झाले आहे. हे अत्याधुनिक कृषी क्षेत्राच्या वापरातील ड्रोन प्रशिक्षित वैमानिकांसह उपलब्ध केले जाते. आम्हांला खात्री आहे की, या कराराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवनिर्मितीच्या संधी निर्माण होतील. भागदारकांना मूल्यधारक सेवा दिल्या जातील. परिणामी शेतक-यांचे जीवनमान कायमस्वरुपी उंचावले जाईल. ’’

महिंद्रा एण्ड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी या करारातून दोन कंपन्यांच्या पुढाकाराने शेतीव्यवसात आमूलाग्र बदल होईल, असे सांगितले. अत्याधनिक तंत्रज्ञानातून होणा-या शेतीउत्पन्नात होणा-या आमूलाग्र बदलाबाबत आपण फारच उत्सुक आहोत या शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘‘ क्रिश ए कंपनीला देशभरातून प्रचंड मागणी आहे. कोरोमंडल कंपनीच्या ग्रोमोर ड्राइव्हच्या मदतीने आम्ही अधिकाधिक भारतीय शेतक-यांना ड्रोनसेवेचा लाभ देत आहोत. शेतीपिकांतील उत्पादनक्षमता वाढेल. शेतक-यांना थेट रसायनांशी संपर्क येणार नाही. या ड्रोनधील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतजमीनीचा कस टिकून राहील यासाठी निवडक खते आणि रसायनेही सूचवली जातील. क्रिश ए कंपनीतर्फे क्रिश ए खेती के लिए एप च्या वापरकर्त्यांना प्रती एकर शेतजमीनीत ड्रोन फवारणीची सुविधा उपलब्ध होईल. वापरकरर्त्यांना या भागीदारीमुळे या सुविधेचा लाभ घेता येईल.’’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -