रस्त्यावर लढाई घेऊन जाणार असल्याचा छगन भुजबळांचा इशारा
नाशिक : प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, मंत्रिपदे किती वेळा आली आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षातही बसलो, त्याचे वाईट वाटले नाही. पण, जी अवहेलना झाली, त्याचे शल्य मनात डाचतेय. ओबीसींनी इतके सारे दिल्यानंतरही ओबीसींवर अन्याय कशासाठी, त्यामागचा हेतू नेमका का? कुणासाठी हे सगळे? असा सवाल करत मी आता अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. ओबीसींची ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जाणार असल्याची भूमिका छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जाहीर केली आहे.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी आपण लगेचच काही निर्णय घेणार नाही. घाईघाईत कोणताही निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
Gate Way of India : गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अजून बाकी आहे, याची आठवण करुन देत भुजबळांनी इशारा दिला. विधानसभेत लाडक्या बहिणींबरोबरीनेच ओबीसी समाजाने महायुतीला मतदान केले. त्यातूनच महायुतीला यश मिळाले. हे विसरु नका. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याची भूमिका भुजबळांनी जाहीर केली आहे.
भुजबळ म्हणाले, मंत्रिपदावर नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गींयासाठी मी लढेल. आपल्या प्रश्नांसाठी एकजुठीने उभे राहा, पुढे आणखी काही संकटं येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर लढाई होणार. कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील. तुम्ही लढायला तयार राहा, असे आवाहन भुजबळांनी केले. त्यामळे घाईघाईत निर्णय नको, विचारपूर्क निर्णय घेऊ असेही भुजबळ म्हणाले.
ओबीसीतून आरक्षण नको एवढाच विरोध होता
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता. आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका, एवढाच होता. आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने पाच वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती. दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील असेही ते म्हणाले. परंतू आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम करून दिला की आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिली, पण तसे नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.