मुंबई : राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. परंतु अशातच राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
तरूणासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने केले असे काही की…
हवामान विभागानुसार, येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. १९, २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच २० डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.