नवी दिल्ली: दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यावर २१ वर्षीय तरूणाला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्याची नखे उखडली. त्याला अशाच स्थितीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी घडली. मृत तरूणाला आरोपी पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा तरूण आरोपीच्या पत्नीसह नको त्या अवस्थेत पकडले गेले. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नी आणि त्या तरूणाला चांगलीच मारहाण केली.
त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या- मृत तरूणाचे काका
मृत तरूणाच्या काकांनी सांगितले की रितीकला अतिशय निर्दयी पद्धतीने मारहाण करण्या आली. इतकंच नव्हे तर त्याची नखेही उखडण्यात आली होती. त्याच्या शरीरावर चटके दिल्याच्या खुणाही होत्या.
टेम्पो चालवण्याचे करत होता काम मृत तरूण
एका शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीने पत्नी आणि तरुणाला दोघांनाही मारहाण केली. तसेच मृत तरूणाला एकापेक्षा अधिक लोकांनी मारहाण केली होती. तो टेम्पो चालवण्याचे काम करत होता आणि आई-वडिलांचा एकटा मुलगा होता.