
६ जणांचा जागीच मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी
भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात (Gujarat Accident) झाल्याची घटना घडली आहे. एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली असन या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभिर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चालकांनी पुकारला बेमुदत संप ठाणे : पगारवाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे (Thane News) परिवहन सेवेच्या सुमारे ७०० चालकांनी बेमुदत संप पुकारला ...
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील त्रापज गावाजवळ ही घटना घडली. भावनगर-तळाजा महामार्गावर भावनगरहून महुव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसने डंपर ट्रकला मागून धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच १०८ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.