तिबिलिसी : रशियाच्या शेजारील देश जॉर्जियाची राजधानी तिबिलिसीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जॉर्जियातील गुदौरीमधील एका रेस्टॉरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे लोक बर्फाळ पर्वतांच्या खोऱ्यातील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. रात्रीचे काम संपवून सगळे झोपायला गेले. मात्र सकाळी खोलीचा दरवाजा उघडला असता सगळे मृत अवस्थेत आढळले. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की मृतदेहांच्या प्राथमिक तपासणीत कोणतीही जखम किंवा हिंसाचाराची चिन्हे आढळली नाहीत.
CM Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३५,७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या
नागपूर : नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या ...
जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी पोलीस सुत्रांच्या हवाले वृत्त दिले की, कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होते, ज्यांचे मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये आढळून आले आहेत.जॉर्जियातील रेस्टॉरंटमधील स्लीपिंग क्वॉर्टर्सच्या बाजूच्या बंदिस्त जागेत पॉवर जनरेटर बसवण्यात आला होता, ज्याचा शुक्रवारी वीज खंडित होताच तो सुरु करण्यात आला. ज्यामुळे विषारी वायू तयार झाला आणि पसरला. ज्यामुळे तेथील भारतीयांना बाधा पोहोचली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा स्थानिक अधिकाऱ्यांच्या तपासात असा खुलासा झाला आहे. तिबिलिसीतील भारतीय उच्चायुक्ताने सांगितले की मृत अवस्थेत सापडलेले सर्व १२ भारतीय नागरिक आहेत. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मृतांपैकी ११ परदेशी होते तर एक पीडित नागरिक होता.
भारतीय दुतावासाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आम्हाला आताच एक दु:खद बातमी समजली की, ११ भारतीयांचा जॉर्जियातील गु्दौरी येथे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही सहवेदना व्यक्त करतो. आम्ही मृतांची माहिती जाणून घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करु.'पोलिसांनी जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम ११६ अंतर्गत (निष्काळजीपणामुळे हत्या) तपास सुरू केला आहे.असं निवेदनात म्हंटले आहे. या घटनेतील मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी फॉरेन्सिक क्राईम टीमसोबत काम करत आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी केली जात आहे.या कर्मचाऱ्यांचा गॅस गळतीने गुदमरुन मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.