पुणे : पुणे एसटी विभागात नव्याने १३४ ई-बस (Pune E-Bus) दाखल होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटीच्या ताफ्यातून लालपरी कमी झाल्याने गाड्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली असून, त्या पुढील दोन महिन्यांत येतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
Mufasa : ‘मुफासा द लायन किंग’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; किंगखानसह दोन्ही मुलांचा आवाज घुमणार
एसटी महामंडळाकडून (MSRTC) डिझेलच्या गाडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. सध्या विविध सवलतीमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे, तसेच वातानूकुलित इलेक्ट्रिक बस असल्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावत आहेत. पुढील काळात या मार्गासह अन्य मार्गांवरही इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा फायदा होणार असून, बसची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवरील इलेक्ट्रिक बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच १३४ इलेक्ट्रिक बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ, आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास उपलब्ध होणार आहे.