मुंबई : ‘मुफासा द लायन किंग’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असताना चाहत्यांना आनंद साजरा करण्याचं कारण मिळालं आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग आता अधिकृतरित्या सुरू झाले आहे. या चित्रपटात शाहरुख खानचा मुलगा अबराम याने मुफासाच्या मुलाला आवाज दिला आहे. तसेच अबराम खान पहिल्यांदाच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे.
ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे
२०१९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘द लायन किंग’च्या मागील भागावर आधारित आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. प्रेक्षक आता या चित्रपटासाठी तिकीट बुक करू शकतात आणि लवकरात लवकर चित्रपट पाहण्याची संधी मिळवू शकतात. या चित्रपटात अबरामशिवाय शाहरुख खान आणि आर्यन खान यांनीही आवाज दिला आहे. चित्रपटामध्ये चाहत्यांना याची झलक पाहता येणार आहे.
काय आहे मुफासाची कथा?
‘मुफासा: द लायन किंग’ ही मुफासाची कथा आहे. ती जंगलाची अभिमानाची भूमी बनते. ही कथा आहे एका अनाथ सिंहाच्या पिलाची, एक अनाथ शावक कसा राजा बनतो. मुले आणि त्यांचे पालक ही कथा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय शाहरुख खानचे चाहतेही हा चित्रपट पाहण्यात खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता चित्रपट काय कमाई करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
या भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट
‘मुफासा: द लायन किंग’ या चित्रपटाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजीशिवाय हा चित्रपट भारतात हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी खान कुटुंबाची निवड करण्यात आली होती. तर, तमिळ आणि तेलगू भाषेतील आणखी काही कलाकारांची निवड करण्यात आली आहे. शाहरुख खानने बालपणापासून यशापर्यंतचा त्याचा प्रवास ‘मुफासा’सारखाच असल्याचे वर्णन केले आहे. हा चित्रपट आता येणाऱ्या २० डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.