नागपूर : काल महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्री पदाचा शपथविधी पार पडला असून आज सकाळपासूनच कामकाजांची सुरुवात झाली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पंधरावे विधानसभेचे अधिवेशन आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवार, २१ डिसेंबर या कालावधीत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. जाणून घ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडणार. (Maharashtra Assembly Winter Session)
आजपासून नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशन सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबत राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आठ विधेयके मांडली जातील. हे अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार असल्यामुळे विदर्भासह राज्यातील जनतेला या पहिल्याच अधिवेशनातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
योजना, कर्नमाफी, हमीभाव मुद्द्यांवर चर्चा
लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, रोजगार आणि इतर अनेक प्रश्नांवर सरकारकडून तातडीने निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा केली जात आहे.