मुंबई : दक्षिण अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गेम चेंजर’ लवकरच चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. दक्षिण अभिनेता राम चरणने रविवारी संध्याकाळी ‘गेम चेंजर’ ऑन एक्स या चित्रपटाबाबत बहुप्रतिक्षित घोषणा केली, ज्यामुळे त्याचे परदेशी चाहते कमालीचे आनंदित झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामध्ये राम चरण आणि कियाराचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.
राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित भारतातीय ड्रामा चित्रपट ‘गेम चेंजर’ १० जानेवारी २०२५ रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. पण त्याआधी राम चरणने गेम चेंजरच्या ॲडव्हान्स बुकींगबाबत त्याच्या एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर एक माहिती शेअर केली आहे, त्यानुसार परदेशात गेम चेंजर या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. राम चरण आणि शंकर या जोडीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही, हे पाहता गेम चेंजर हा चित्रपट नक्कीच चांगली सुरुवात करेल अशी अशा आहे. कियारा अडवाणी ही पहिल्यांदाच राम चरणसोबत चित्रपटात काम करत आहे. ‘गेम चेंजर’चा टीझर, ट्रेलर आणि गाणी या दोघांची जोडी चाहत्यांनी आधीच पसंत केली आहे. आता चाहत्यांना फक्त चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.
Kiran Gaikwad : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात
अभिनेता राम चरणने ही पोस्ट शेअर करून इंस्टाग्रामवर लिहिलंय की, “एक प्रचंड जागतिक वादळ सुरू झाले आहे. गेम चेंजरसाठी परदेशी बुकिंग आता सुरु झाले आहे. १०-०१-२०२५ रोजी जगभरातील थिएटरमध्ये या चित्रपटाचा अनुभव घ्या.” असे लिहून अभिनेत्याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. गेम चेंजरची ॲडव्हान्स बुकिंग यूके आणि उत्तर अमेरिका सारख्या परदेशातील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये सुरु केली गेली आहे आणि चाहत्यांचा या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
A massive global storm has begun! #GameChanger overseas bookings are now open!
Experience it in cinemas worldwide from 10-01-2025! ❤️🔥 @shankarshanmugh @advani_kiara @yoursanjali @iam_SJSuryah @MusicThaman @DOP_Tirru @artkolla @AntonyLRuben @SVC_official @ZeeStudios_… pic.twitter.com/Fa342WC23x
— Ram Charan (@AlwaysRamCharan) December 15, 2024
गेम चेंजरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी, एसजे सूर्या, अंजली, नवीन चंद्रा, सुनील, श्रीकांत, आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात राम चरण वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. दिल राजू निर्मित, या चित्रपटाच्या ध्वनिफिती थमनने संगीतबद्ध केल्या आहेत, ज्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने आधीच जिंकली आहेत.