
थंडीमुळे राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी
पुणे : किरकोळ बाजारात ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात घट झाली आहे. शेवग्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. बाजारात गुजरातमधील शेवग्याची आवक सुरू झाल्याने दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (Drumstick Price Fall)
आमटी, सांबारमध्ये सढळ हाताने वापरण्यात येणाऱ्या शेवग्याची आवक कमी झाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळाले होते. शेवगा महाग झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले होते. शेवगा खरेदीकडे गृहिणींनी पाठ फिरवली होती. उपाहारगृह चालकांकडून शेवग्याचा सांबारऱ्यामध्ये वापर करण्यात येतो. शेवगा महाग झाल्याने उपाहारगृह चालकांकडून शेवग्याला बेताची मागणी होती.

कोल्हापूर : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. ...
तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले होते. हवामान बदल आणि थंडीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी झाली होती. दरम्यान, सध्या शेवग्याचे दर कमी झाले असून, यापुढे दरवाढ होण्याची शक्यता नसल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील शेवगा व्यापारी रामदास काटकर यांनी सांगितले.
गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू
गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गुजरातमधून दररोज १०० ते १२५ डाग (एक डाग ३० ते ३५ किलो) शेवग्याची आवक होत आहे. गुजरातमधील शेवग्याची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असतो. त्यानंतर सोलापूर, नाशिक भागातील शेवग्याचा हंगाम सुरू होतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील शेवग्याचा हंगाम चार महिने असतो. परराज्यातील शेवग्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेवग्याला ग्राहकांकडून जास्त मागणी असते.