कोल्हापूर : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनी दंडात्मक कारवाईला न जुमानता रविवारी पुन्हा उत्खनन करीत होती. यासंबंधी पुराव्यानिशी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे कंपनीस उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गौणखनिज उत्खननप्रकरणी दोषी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीस दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही, या कंपनीकडून रविवारी उत्खनन होत असल्याची तक्रारी झाली. त्यानंतर तातडीने उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीने पुन्हा उत्खनन केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल. असं पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं आहे.देसाई यांनी पहिल्यांदा तक्रार केल्यानंतर १० डिसेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दखल घेऊन कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले. यानंतर ११ डिसेंबर रोजी तहसीलदार शिंदे यांनी उत्खनन करणाऱ्या कंपनीस दंड करून अहवाल पाठवला. प्रशासनाच्या या दंडात्मक कारवाईला केराची टोपली दाखवत कंपनी रविवारी उत्खननाचे धाडस केले आहे.याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
https://prahaar.in/2024/12/16/sit-probe-into-santosh-deshmukhs-murder-chief-minister-devendra-fadnavis/#google_vignette
कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी गौणखनिजची आवश्यक आहे. यासाठी गायमुखाजवळ ठेकेदार कंपनी उत्खनन करीत आहे. जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट असलेल्या गटातच कंपनी उत्खनन करीत आहे, असे पन्हाळा तहसील प्रशासनाने म्हणणे आहे. दरम्यान, ‘प्रजासत्ताक’चे अध्यक्ष देसाई यांनी यावर आक्षेप घेतला. ज्या पद्धतीने डोंगर परिसरातील सुरू असलेले हे बेकायदेशीर उत्खनन पाहता याला सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार असून, यामुळे भविष्यात मंदिराला धोका निर्माण होणार आहे.अशी तक्रार त्यांनी केली होती.तसेच माळीण दुर्घटनेची येथील पुनरावृत्ती होईल, अशी भीतीही देसाई यांनी व्यक्त केली आहे.त्याची दखल घेऊन तहसीलदार शिंदे यांनी तलाठीकरवी पंचनाम केला. यामध्ये १५० ब्रास माती, मुरूम गौणखनिज अनधिकृत उत्खनन केलेल्याचे स्पष्ट झाले.विवारी त्याच ठिकाणी उत्खनन सुरू केले होते. तक्रारदार देसाई यांनी याचे फोटो, व्हिडीओसह जिल्हाधिकारी यांच्याकडे ई- मेलद्वारे तक्रार केली. कंपनीने उत्खनन करणे बंद केले आहे. यानिमित्ताने पन्हाळा तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.