Health: हाडांमधून कट-कट असा आवाज येतो तर जरूर खा हा पदार्थ

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या युगात तरूण वर्गामध्येही लोकांना हाडांमध्ये दुखण्याच्या समस्या आढळतात. दर दिवशी हात, पाय, कंबर दुखीचा त्रास होत असतो. यामुळे अनेकदा दैनंदिन कामे करणेही कठीण होते.


कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे मोठ्या प्रमाणात कमकुवत होतात. अशातच तुम्हाला दररोजच्या डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असेल. तसेच हाडेही मजबूत होतील.


डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते मात्र याशिवाय ड्रायफ्रुट्समध्येही जसे खजुरामध्येही कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. खजूर हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडे निरोगी राखण्यास मदत होते. याशिवाय खजुरामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांसोबत व्हिटामिनही आढळते.


दुधासोबत खजुराचे सेवन तुमच्या हाडांना निरोगी राखण्याचे काम करते. खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पाचनशक्ती तंदुरुस्त राहते. इतकंच नव्हे तर यामुळे पोटातील मायक्रोबायोम म्हणजेच चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात.यामुळे गट हेल्थ चांगली राहते.

Comments
Add Comment

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड