मुंबई : सलमान खान होस्ट करत असणाऱ्या बिग बॉस शो नेहमीच चर्चेत असतो. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेला बिग बॉस १८ शो सुरुवातीपासून ट्रेंडीग आहे. यंदाच्या सीझनमध्ये चाहत पांडे, विवियन डिसेना, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा असे अनेक स्पर्धक असून दररोज एक नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या सीझनला प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता हा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस १८ हा पुढच्या महिन्यात संपणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्यापही शोच्या फिनाले तारखेविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या शोचा ग्रँड फिनाले १९ जानेवारी रोजी होणार असल्याचा अंदाज दिला जात आहे. तर काही रिपोर्टनुसार, बिग बॉस १८ च्या फिनालेची तारीख १९ जानेवारी नसून ८ किंवा १५ फेब्रुवारी असू शकते. या दरम्यान, यंदाचा विजेता कोण होणार असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये पडला आहे.