Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीPankaja Munde : माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी...

Pankaja Munde : माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळाली!

मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

नागपूर : महायुती (Mahayuti) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) आज नागपूर येथे संपन्न होत आहे. आज सकाळपासून काही आमदारांना फोन करून मंत्रीपदासाठी तयार राहण्यास सांगण्यात येत आहे. अशातच भाजपा आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना देखील मंत्रिपदासाठी वरिष्ठांचा फोन आला आहे. दरम्यान दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडे यांनी आनंदाच्या शब्दात सर्वांचे आभार मानून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Cabinet : महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला आला फोन? पाहा यादी

‘मी मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. २०१४ मध्ये मी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती. आता, पुन्हा एकदा संधी मिळत आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -