Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीMaharashtra Cabinet : महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला आला फोन? पाहा...

Maharashtra Cabinet : महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला आला फोन? पाहा यादी

मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet) आज पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज ३९ मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काही आमदारांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीचे मंत्री ठरले असल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह१९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) १२ मंत्रि‍पदे मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह (Ajit Pawar) १० खाती मिळणार आहेत.

Crime News : लग्नांचा खेळ! दोघींशी लग्न, तिसरीसोबत फोडली लग्नाची सुपारी आणि चौथीसोबत सुरु लग्नाची बोलणी

दरम्यान, आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी आमदारांना फोन करुन मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. पाहा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला. (Mahayuti Minister List 2024)

भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन

  • नितेश राणे
  • शिवेंद्रराजे भोसले
  • चंद्रकांत पाटील
  • पंकज भोयर
  • मंगलप्रभात लोढा
  • गिरीश महाजन
  • जयकुमार रावल
  • पंकजा मुंडे
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • गणेश नाईक
  • मेघना बोर्डीकर
  • जयकुमार गोरे
  • अतुल सावे
  • माधुरी मिसाळ
  • चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन

  • उदय सांमत
  • प्रताप सरनाईक
  • शंभूराज देसाई
  • योगेश कदम
  • आशिष जैस्वाल
  • भरत गोगावले
  • प्रकाश आबिटकर
  • दादा भूसे
  • गुलाबराव पाटील
  • संजय राठोड
  • संजय शिरसाट

राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन

  • आदिती तटकरे
  • बाबासाहेब पाटील
  • दत्तामामा भरणे
  • हसन मुश्रीफ
  • नरहरी झिरवाळ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -