मुंबई : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती स्टार भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचा साखरपुडा झाला. पीव्ही सिंधूचा अखेर शनिवार, आयटी प्रोफेशनल वेन्कट दत्ता साईंसोबत साखरपुडा पार पडला आहे. सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याबाबत खुशखबर दिली आहे. सिंधूच्या लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून उदयपूरमध्ये सुरू होणार आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी लखनऊमधील सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर पीव्ही सिंधूने लग्नाची घोषणा केली होती. 22 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये सिंधू आणि व्यंकट जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.सिंधूच्या लग्नाचा सोहळा २० डिसेंबरला उदयपूरमध्ये सुरू होणार असून २२ डिसेंबरला लग्न होणार आहे. त्यांनतर तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनही होणार आहे.
सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे हैदराबादस्थित पोसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी वित्त, डेटा विज्ञान आणि मालमत्ता व्यवस्थापन या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. या सोहळ्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेकांना पीव्ही सिंधूने लग्नासाठी आमंत्रित केलं आहे.
दरम्यान, सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितले की, दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरले. जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे लग्नासाठी हीच वेळ योग्य आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…