‘‘मजेशीर भांडण’’ - कविता आणि काव्यकोडी

मुंग्या होत्या
पोहत पाण्यात
गप्पा मारीत
दंग गाण्यात

गाणे त्यांच
खूपच गोड
गप्पांना त्यांच्या
नाही तोड

तेवढ्यात पाण्यात
आला हत्ती
पोहण्यात म्हणतो
मज्जा कित्ती

मुंग्यांकडे मग
पाहून हसला
सोंडेने पाणी
उडवीत बसला

मुंग्या चिडून
आल्या काठावर
एक बसली
त्याच्या पाठीवर

बाकीच्या मुंग्या
म्हणाल्या तिला
हसतोय कसा बघ
बुडव त्याला.

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) तिन्ही ऋतूंमध्ये
खाणे हितकारक
रूचकर, मधुर
आहे अग्निदीपक

रात्रीच्या वेळी मात्र
खाऊ नये म्हणतात
दुधात विरजण घालून
काय बनवतात?

२) भक्कम हा वृक्ष
त्याचे आयुष्यही खूप
श्रद्धा, महात्म्याचं
जणू देखणं रूप

‘बरगद का पेड’
हिंदीत म्हणतात त्याला
या दाढीवाल्या झाडाचं
नाव काय बोला?

३) निसर्ग सारा येई मोहरून
चैत्रपालवी पानोपानी
सण सौख्याचा घेऊन येई
मनोमनी आनंदगाणी

वस्त्र तांबडे, माळ फुलांची
साखरेची पदके मानाची
काठीवरी झुलते लोटी
सांगे कहाणी कोणत्या सणाची?

उत्तर -

१) दही
२) वड
३) गुढीपाडवा
Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा