Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kiran Gaikwad : 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात

Kiran Gaikwad : 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात

मुंबई : 'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) अखेर विवाहबंधनात अडकला आहे.अभिनेता किरण गायकवाडला 'देवमाणूस' या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.त्यांनतर आता त्याने वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. मागील काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात किरणच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे त्याचे चाहते सुद्धा उत्सुक होते. अखेर आज १४ डिसेंबरच्या दिवशी लग्नबंधनात अडकून किरण-वैष्णवी साताजन्माचे सोबती झाले आहेत.



किरण आणि वैष्णवीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी दोघे लग्नबंधनातही अडकले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.किरण आणि वैष्णवीच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या अनेक कलाकार मित्रमंडळींनीही हजेरी लावली होती. वैष्णवीने लग्नासाठी जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली आहे तर किरणने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघेही या नव्या पोशाखात फारच सुंदर दिसत होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या साखरपुडा, संगीत, मेहंदी आणि हळद समारंभाचेही फोटो समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

Comments
Add Comment