Thane Traffic : वाहतुकीच्या पुढील पाच वर्षांतील आव्हानांचा होणार अभ्यास

  59

आराखड्याची आयआयटी-मुंबईमार्फत फेरआखणी


ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे २०१८ मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेश वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईच्या 'जीआयएसई हब'च्या मदतीने फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात, आयआयटी, मुंबईतील जीआयएसई हबचे प्रा. सुमीत सेन यांच्यासोबत यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते.


मूळ आराखडा सन २०१८चा
मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. २०१० पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. २०१८ मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात, मेट्रो मार्गांचे आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्प, ठाणे-मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंद नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते.


वर्षभरात होणार फेरआखणी
या आराखड्यातील तरतूदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१८ मधील या आराखड्याची फेरमांडणी करून २०३० पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी, आयआयटी, मुंबईतील 'जीआयएसई हब' या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


फेरआखणीचा उद्देश
शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे, त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय व सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे. आयआयटी, मुंबईतील 'जीआयएसई हब'मधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती, नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.


तसेच ही फेरमांडणी करताना, त्यात वाहतुकीचे बदलेले पॅटर्न, शालेय बसेस तसेच इतर गाड्यांची वाढलेली वाहतूक, घनकचऱ्याची वाहतूक, बांधकामातील राडारोड्याची वाहतूक यामुळे वाहतुकीवर येणारा ताण याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच, सायकल ट्रॅक, केवळ पादचारी वाहतुकीसाठीची व्यवस्था यांचाही विचार केला जाणार आहे. ठाणे शहरालगत असलेल्या खाडीचा जल वाहतुकीसाठी कसा उपयोग करता येईल याबद्दल त्यात अभ्यास करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली आहे. मेट्रो, रेल्वेपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची रचना, पार्किंग व्यवस्था, तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीबाबत सूचना यांचाही या फेरमांडणीत अभ्यासही करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या