हैदराबाद : पुष्पा फेम सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी सांध्यामहालयात झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या घटनेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा ८ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुनला हैदराबादमधील त्याच्या राहत्या घरातून चेंगराचेंगरी प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली होती.
Ministry Expansion : ठरलं तर! मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाचं होणार
अल्लू अर्जुनला शुक्रवारी तेलंगणा उच्च न्यायालयाने ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर अंतरिम जमीन मंजूर केला मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत वेळेवर अपलोड न झाल्यामुळे त्याला रात्र तुरुंगातच काढावी लागली. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास चंचलगुंडा सेंट्रल जेलमधून त्याची सुटका करण्यात आली.
अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पुष्पा २ च्या प्रीमियमदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.