Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMinistry Expansion : ठरलं तर! मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाचं होणार

Ministry Expansion : ठरलं तर! मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाचं होणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता थेट नागपूरलाच (Nagpur) महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवार ऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाला असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे १०, शिवसेनेचे १२ आणि भाजपचे २१ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मात्र, ऐनवेळी या नावांवर शिक्कामोर्तब होऊन अधिकृतपणे ती जाहीर केली जाऊ शकतात. त्यामध्ये, काहीसे बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरला होणार असल्याचं समजतंय.

Economy : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री

आमदारांच्या सोईसाठी शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवन ऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपुरमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -