Wednesday, May 14, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व

EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे

EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे

मुंबई : EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. याआधी पीएफचे पैसे क्लेम केल्यानंतर सात ते दहा दिवसांची वाट पाहावी लागते. त्यानंतर पैसे संबंधित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जात होते. मात्र आता पीएफचे पैसे लगेचच मिळू शकणार आहेत. (EPFO Card)



ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, सदस्य अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकणार आहेत. ईपीएफओ सदस्यांना या नवीन सर्व्हिससाठी खास कार्ड देणार आहे. त्यामुळे सदस्य लवकरच पीएफचे पैसे एटीएममधून काढू शकणार आहेत. ही सेवा लवकरच ही सर्व्हिस लाँच केली जाणार आहे. यामुळे ईपीएफओ सदस्यांना खूप फायदा होणार आहे.



ईपीएफओ सदस्यांसाठी खास कार्ड (EPFO Card)


ईपीएफओने सात कोटीपेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या सर्व्हिसअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमुळे ते एटीएममधून पैसे काढू शकणार आहे.



नॉमिनीला मिळणार ही सर्व्हिस (EPFO Service)


EPFO योजनेतील एखाद्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा नॉमिनी हे पैसे काढू शकतात. EDLI योजनेअंतर्गत मृत कर्मचाऱ्याचे नॉमिनी ७ लाखांपर्यंत पैसे काढू शकतात.

Comments
Add Comment