नवी दिल्ली : काल पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) निवृत्तीची घोषणा केली. यामुळे पाकिस्तान टीमला (Pakistan Team) धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा टीमला धक्का बसला आहे.
Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही मोहम्मद आमिरने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र त्याने पुन्हा पाकिस्तान संघात कमबॅक केलं होते. दरम्यान आज पुन्हा मोहम्मद आमिरने संघातून निवृत्ती घेतली आहे.