 
                            मुंबई : हिवाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. १४ डिसेंबर २०२४ ते दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई शहर , उपनगरांसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आला आहे. १५ टक्के पाणी कपात केल्यामुळे आज आणि रविवारी याचा परिणाम होणार आहे.
पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्रातील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले आहेत. सहा पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम १४ व १५ डिसेंबर रोजी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे.
 
          मुंबई : दर रविवारी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या देखील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ...
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडीतील काही परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सहा उदंचन पंप बंद पडल्यामुळे ठाणे आणि भिवंडमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की , त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

 
     
    




