Saturday, May 10, 2025

देशमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Allu Arjun Arrested Updates : अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

Allu Arjun Arrested Updates : अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

हैदराबाद : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनला (Allu Arjun) आज तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अल्लू अर्जुनला आधी नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर हायकोर्टाने धाव घेतली. आता सुपरस्टार पुष्पा फेम आली अर्जुनला दिलासा मिळाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणात अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. पोलिसांनी आज सकाळीच अभिनेत्याला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत पत्नीच्या पतीने अभिनेत्याविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. अटक केल्यानंतर आज सकाळी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते.


उच्च न्यायालयाकडून निर्णय आला त्यावेळी अल्लू अर्जुनला कनिष्ठ न्यायालयाकडून चेंगराचेंगरी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करताच त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून तातडीने सुनावणीची मागणी करत हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, आता उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.



उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन मंजूर केल्यानंतर अल्लू अर्जुन भावुक झालेला दिसला. आज सकाळीच पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याची पत्नी चिंतेत दिसली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मला ना धड नाश्ता करु दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला अशी तक्रार अल्लू अर्जुनने केली होती. दिवसभरात पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढल्यानंतर अखेर त्याला दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला. “अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीत सहभागी नव्हता, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे मान्य नाही, मी अटकेचा निषेध करतो.” असे त्यांनी म्हटलंय.


Comments
Add Comment