Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीPM Modi : महाकुंभमेळा एकतेचा महायज्ञ

PM Modi : महाकुंभमेळा एकतेचा महायज्ञ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन

नवी दिल्ली : कुंभ हे कोणत्याही बाह्य प्रणालीपेक्षा मनुष्याच्या आंतरिक चेतनेचे नाव आहे. ही जाणीव आपोआप जागृत होते. ही जाणीव भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या काठावर खेचते. त्यामुळे हा महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे मी पुन्हा एकदा सांगतो. ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या भेदभावाचा त्याग केला जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्रवारी प्रयागराजला येथे गंगा पूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनदेखील केले. हनुमान मंदिर कॉरिडॉर, भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, शृंगवरपूर कॉरिडॉर यासह ५५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाकुंभ मेळ्यातील १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच अक्षयवत, हनुमान मंदिर, सरस्वती विहीर, भारद्वाज आश्रम आणि शृंगवरपूर धाम कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा हल्लाबोल

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभ हे आपल्या देशाच्या हजारो वर्षांपूर्वी चालत आलेल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे एक सद्गुण आणि जिवंत प्रतीक आहे. हा केवळ तीन पवित्र नद्यांचा संगम नाही. आपला भारत हा पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा अशा असंख्य पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांच्या प्रवाहाचे पावित्र्य, या असंख्य तीर्थक्षेत्रांचे महत्त्व आणि महानता, त्यांचा संगम, त्यांचे संयोजन, त्यांचा प्रभाव, त्यांचे वैभव, हा प्रयाग आहे. प्रयाग म्हणजे जिथे प्रत्येक पायरीवर पवित्र स्थाने आहेत, जिथे प्रत्येक पायरीवर पुण्य क्षेत्र आहेत.

पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ २०२५ साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी १० नवीन रोड ओव्हर ब्रिज किंवा फ्लायओव्हर, कायमस्वरूपी घाट आणि रिव्हरफ्रंट रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रयागराजमध्ये घडत आहे नवा इतिहास

पंतप्रधान मोदींनी संगमाला अभिवादन केले. येथे रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. जगातील एवढा मोठा कार्यक्रम, दररोज लाखो भाविकांच्या स्वागताची व सेवेची तयारी, सलग ४५ दिवस चालणारा महायज्ञ, नव्या महानगराच्या स्थापनेची भव्य मोहीम, प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास रचला जात आहे.

‘मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उपस्थितांना संबोधित करत आहेत. योगी म्हणाले की, जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी आहेत. यमुना, गंगा आणि सरस्वतीच्या त्रिवेणीच्या पूजन विधीनंतर पंतप्रधान मोदींच्या आगमनाने महाकुंभाची सुरुवात झाल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी महाकुंभ प्रदर्शनाला दिली भेट

संगम काठावर आयोजित महाकुंभ प्रदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना भाविकांसाठी असलेल्या सुविधा आणि गर्दीचे व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर माहिती दिली. घोषणांची माहिती अनेक भाषांमध्ये देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -